लाच स्वीकारणारा कॉन्स्टेबल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:56 AM2018-03-28T00:56:56+5:302018-03-28T11:18:25+5:30

चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

Constable arrested for taking bribe | लाच स्वीकारणारा कॉन्स्टेबल गजाआड

लाच स्वीकारणारा कॉन्स्टेबल गजाआड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र तुळशीराम वेलदोडे (४८ रा. रामनगर पोलीस कॉलनी) असे लाच स्वीकाणा-या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलाच्या नावावर नूतन वसाहत भागात देशी दारूचे दुकान आहे. वडिलांच्या निधन झाल्यामुळे देशी दारू दुकानाचा परवाना तक्रारदारास आईच्या नावे करायचा होता. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यातून आईच्या नावे चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता असल्याने तक्रारदार या संबंधीचे काम पाहणा-या गोपनीय शाखेतील राजेंद्र वेलदोडे यास २० मार्चला भेटले. चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी वेलदोडे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. कुठलाही गुन्हा दाखल नसताना अहवालासाठी पैसे कशाला लागतात, अशी विचारणा तक्रारदाराने केली. तेव्हा वेलदोडे याने दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. आता पाच हजार रुपये द्या. . उर्वरित पाच हजार काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. नाईलाजास्तव तक्रारदाराने पाच हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून कदीम जालना पोलीस ठाण्यात सापळा लावून वेलदोडे यास तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Constable arrested for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.