कार्यकर्त्यांचे जाळे योग्य वेळी झाले सक्रिय; परतूरमधून बबनराव लोणीकरांची हॅट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 06:17 PM2024-11-26T18:17:40+5:302024-11-26T18:18:08+5:30
उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा ५ हजार ९८ मतांनी झाला पराभव
परतूर : परतूर विधानसभा मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिस्पर्धी उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा ४७४० मतांनी पराभव करीत विजयांची हॅट्ट्रिक साधली आहे, तर तिरंगी लढतील अपक्ष उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना ५३,५८७ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
परतूर विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र, या मतदारसंघात पहिल्यापासून तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. यात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, महाविकास आघाडी उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे आणि काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांच्यात लढत झाली. यामध्ये विद्यमान आमदार लोणीकर यांना ७०,६५९ मते मिळाली, तर उद्धवसेनेचे आसाराम बोराडे यांना ६५,९१९ मते मिळाली. त्यामुळे लोणीकरांनी आसाराम बोराडे यांच्यावर मात करीत ४७४० मतांनी विजय मिळाला आहे. या तिरंगी लढतील अपक्ष उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांना ५३ हजार ९२१ मते मिळाली आहेत. तसेच, वंचितचे उमेदवार रामप्रसाद थोरात यांनाही २९८१० मते मिळवली आहे.
विजयाची तीन कारणे
१ परतूर विधानसभा मतदारसंघात बबनराव लोणीकर यांनी आमदार असताना विविध विकासकामे केली. आर्थिक बाजू बळकट आहे.
२ त्याचबरोबर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याचाही परिणाम झाला आहे.
३ परतूर मतदारसंघात लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक असल्यामुळे प्रचारासाठी फायदा झाला आहे.
बोराडेंच्या पराभवाची कारणे...
परतूर विधानसभा मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार आसाराम बोराडे यांचा ४७४० मतांनी पराभव झाला आहे. बाेराडे यांना ऐनवेळी तिकीट मिळाल्यामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. तसेच, आर्थिक परिस्थिती प्रतिस्पर्धी उमेदरावांपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे बंडखोर उमेदवार सुरेशकुमार जेथलिया यांच्यामुळे कार्यकर्ते विभागले गेले.
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) भारतीय जनता पक्ष ७०,६५९
आसाराम जिजाभाऊ बोराडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६५,९१९
सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया अपक्ष ५३,९२१
रामप्रसाद किसनराव थोरात वंचित बहुजन आघाडी २९,८१०
मोहनकुमार हरिप्रसाद अग्रवाल अपक्ष १६३३
आसाराम सखाराम राठोड पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) १२७९
कृष्णा त्रिंबकराव पवार ऑल इंडिया हिंदुस्थान काँग्रेस पक्ष १०४५
श्रीराम बन्सीलाल जाधव जय सेवालाल बहुजन विकास पार्टी ८०२
नामदेव हरदास चव्हाण अपक्ष ९९७
अजहर युनूस शेख अपक्ष ८१२
अहेमद महमद शेख बहुजन समाज पार्टी ६९२