‘कोळी’चे नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:54+5:302021-01-18T04:27:54+5:30
जालना : मोसंबीवरील कोळी किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय चांगली प्रतीचे फळे मिळून ...
जालना : मोसंबीवरील कोळी किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास फळे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. शिवाय चांगली प्रतीचे फळे मिळून बाजारभाव चांगला मिळतो. यासाठी मोसंबीचा बहर धरल्यानंतर फळ धारणा सुरू झाल्यास झाडावर १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या डायकोफॉल (१८.५ इसीत्न. २ मिली किंवा व पाण्यात मिसळणारे गंधक ३ ग्राम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांनी केले आहे.
मोसंबी हे जालना जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ पीक आहे. सध्या मोसंबी पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात मोसंबी फळाची प्रत खराब असून खराब झालेल्या फळास बाजारामध्ये योग्य तो भाव मिळत नाही. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी व मृदशास्त्रज्ञ प्रा. राहुल चौधरी यांनी अंबड तालुक्यातील घुंगरडे हदगाव येथील शेतकरी चोरमले यांच्या मोसंबी बागेस नुकतीच भेट देऊन शेतक-यांना मार्गदर्शन केले.
आंबे बहारासाठी मोसंबीस ताण तोडल्यास झाडास शेणखत व शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा योग्य प्रमाणात द्यावी, असे प्रा. चौधरी यांनी सांगितले.
चौकट
सध्या मोसंबीची बाग फळावर असून, मोसंबीवर कोळी किडींच्या प्रादुर्भावामुळे फळे काळे पडून खराब होत आहेत. कोळी ही अष्टपदी कीटक आहे. ही कीड सूक्ष्म असल्यामुळे डोळ्याला सहजासहजी दिसून येत नाही. या किडीचा प्रादुर्भाव पानावर, फळांवर आढळून येतो. ही कीड पानातील व फळातील रस शोषण करते. त्यामुळे प्रारंभी पानावर व फळांवर ठिपके दिसून येतात. नंतर पूर्ण फळे चंदेरी काळपट रंगाचे दिसण्यास प्रारंभ होतो, असेही मिटकरी म्हणाले.