कोरोना पूर्वीच रेनबोचे नमस्ते अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:23 AM2020-03-15T00:23:54+5:302020-03-15T00:24:24+5:30
नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नमस्ते करीये..स्वस्थ रहिये...रोग मुक्त रहे हिंदुस्तान हे ब्रिदवाक्य घेऊन रोटरी क्लबचाच भाग असलेल्या रोटरी रेनबो क्लबने १५ फेब्रुवारीलाच नमस्ते अभियानाचा प्रारंभ केला होता. आणि आपले दुर्भाग्य म्हणून की, काय संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसचे थैमान पुढे आले. एक प्रकारे प्रत्येकाला एक चौथा सेन्स असतो, जणू काही हे अभियान सुरू होणे आणि कोरोनाचा हल्ला हा योगायोग म्हणावा लागेल अशी प्रतिक्रिया डॉ. आरती मंत्री यांनी व्यक्त केली.
भारतीय संस्कृती तसेच उर्दू संस्कृतही भेटल्यानंतर एकमेकांना नमस्कार अर्थात स्वागत केले जाते. त्यासाठी भारतीय पध्दतीत दोन्ही हात जोडून एखाद्याचे स्वागत करण्याची जुनीच परपंरा आहे. तसेच उर्दू संस्कृतीतही आदाबर्जे करण्याची पध्दत आहे. या पध्दतीतून एमेकांचे स्वागत करतांना हातात-हात न घेता केवळ दूरवरूनच एकमेकांबद्दलचा आदरभाव व्यक्त केला जातो. आणि तोच संदेश सध्या संपूर्ण जगभर कोरोनाच्या व्हायरसमुळे दिला जात आहे.
एकमेकांच्या हातात-हात न मिळविण्याचे निर्देश आरोग्य विभागाने अर्थात डॉक्टरांनीच दिले आहेत.
त्यामुळे हे अभियान आम्ही रोटरी क्लबच्या बैठकीत साधारपणे १५ फेबु्रवारीलाच घेण्यात आला. आणि त्याचे जागोजागी स्वागतही झाले.
आता कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून हात न मिळविण्याच्या सूचना आहेत. या रेनबोच्या उपक्रमाचा आता मोठा लाभ आणि त्याचे महत्वही नागरिकांना पटले असल्याची माहिती रेनबोचे अध्यक्ष विवेक मणियार यांनी सांगितले.
अवलंब गरजेचा
या नमस्ते इंडियाचा प्रयोग जालन्यात ज्यावेळी प.पू. गोविंद गिरी महाराज आले असता त्यांनाही समजावून सांगण्यात आला.
त्यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून याचाच अवलंब जास्तीत जास्त नागरिकांनी करण्याचा सल्ला दिल्याचेही मणियार यांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी रेनबो क्लबचे सर्व सदस्य पुढाकार घेतल्याची माहितीही मणियार यांनी दिली.