गुंडेवाडी येथे कोरोना जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:42+5:302021-04-23T04:32:42+5:30

जालना : तालुक्यातील गुंडेवाडी येथे कोरोना आजाराविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करून नियमांचे ...

Corona Awareness Campaign at Gundewadi | गुंडेवाडी येथे कोरोना जनजागृती मोहीम

गुंडेवाडी येथे कोरोना जनजागृती मोहीम

Next

जालना : तालुक्यातील गुंडेवाडी येथे कोरोना आजाराविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी सरपंच मनोहर पोटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर लहाने, अंगणवाडी सेविका मंगलबाई खांडेभराड, आशा सेविका लता जुंबड, कृषीसेवक वाघ, गणपत गजर, लहाने आदी उपस्थित होते.

बदनापूर येथे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क

बदनापूर: बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राच्या माध्यमातून भविष्यात मोसंबीचे चांगले वाण विकसित करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात मोसंबी बाग सर्वेक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यात मोसंबीचे क्षेत्र अधिक असलेल्या भागात तज्ज्ञांकडून सर्वेक्षण केले जात आहे.

कापड व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोना विषाणू संसर्गांमुळे संचारबंदी लागू असतानाही परतूर शहरातील बालाजी कॉर्नर परिसराती ल राजेंद्र भिकुलाल लोया या कापड व्यापाऱ्याने बुधवारी सकाळी दुकान सुरू केले होते. संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी सुनील भगवानराव होंडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लसीकरणाला प्रतिसाद

सिपोरा बाजार: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई आरोग्य केंद्रांतर्गत सिपोरा बाजार उपकेंद्रात कोरोना लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. या उपकेंद्रांतर्गत १३९ नागरिकांना लस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

ठिकठिकाणी कचरा

जालना : शहरातील भाग्यनगर भागातील मुख्य रस्त्यावर कचरा कुंडी नाही. त्यामुळे अनेकजण कचरा टाकत आहेत. ही स्थिती पाहता नगर पालिकेचे मुख्याधिकारी नार्वेकर यांनी कचरा कुंडी बसवावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Corona Awareness Campaign at Gundewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.