भक्तीपुढे कोरोना पडला फिका... भाविकांनी टेकला पायरीवर माथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:06+5:302021-07-21T04:21:06+5:30
‘भज गोविंदम् भज गोपाला’च्या गजरात ही पालखी मिरणूक परंपरेप्रमाणे काढण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे यंदाही मंदिर बंद होते. त्यामुळे सर्वसामान्य ...
‘भज गोविंदम् भज गोपाला’च्या गजरात ही पालखी मिरणूक परंपरेप्रमाणे काढण्यात आली.
दरम्यान, कोरोनामुळे यंदाही मंदिर बंद होते. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना नेहमीप्रमाणे स्वामींच्या समाधीचे दर्शन घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. काहींनी तर मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेणे पसंत केले. मंदिर व्यवस्थापनाने मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली होती, तसेच जवळपास २५ फुटांवरून दर्शनाची व्यवस्था केली होती. त्यामुळे काही भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत दर्शन घेतले; परंतु तरीही थोडीबहूत गर्दी ही झालीच होती.
विठ्ठल मंंदिरांमध्ये विधिवत अभिषेक
शहरातील कसबा विठ्ठल मंदिर, जुना जालना भागातील सहकार कॉलनीतील विठ्ठल मंदिर, तसेच रामनगर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विधिवत अभिषेक, तसेच अन्य परंपरागत विधी करण्यात आले. भाविकांनी येथेही दर्शनासाठी गर्दी केली होती; परंतु कसबा विठ्ठल मंदिरात मंदिराच्या प्रवेद्वारातूनच विठ्ठलाचे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध केली होती.