कोरोना परतू लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:05+5:302021-07-21T04:21:05+5:30
जालना : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी लागू ...
जालना : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून कधी लॉकडाऊन तर कधी संचारबंदी लागू करावी लागत आहे. कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून, बहुतांश नागरिक पुन्हा आपल्या गावी परतले होते; परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. आता सर्वच व्यवहार हळूहळू सुरू झाले असून, कोरोनामुळे गावी आलेले नागरिक पुन्हा मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये कामासाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
माझा मुलगा कर्नाटक राज्यात शिक्षणासाठी गेलेला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातल्याने तो परत आला होता. काही दिवसांपूर्वीच तो पुन्हा गेला आहे. त्यामुळे चिंता वाटते.
- जयश्री शिंदे
माझा मुलगा परेदशात आहे. कोरोनामुळे मला त्याची काळजी वाटते. गेल्या दीड वर्षातून दोन वेळा तो गावी आलेला आहे; परंतु कोरोनाच्या फैलावामुळे त्याची मला चिंता वाटते.
- सुरेखा मते