अब तुम्हारे हवाले कोरोना साथियो....प्रशासनाचे हात वर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:35+5:302021-03-07T04:27:35+5:30
चौकट कॉट्रॅक्ट ॲण्ड ट्रेसिंकडे दुर्लक्ष जालना शहरासह ग्रामीण भागात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. असे असताना आता पूर्वीप्रमाणे ...
चौकट
कॉट्रॅक्ट ॲण्ड ट्रेसिंकडे दुर्लक्ष
जालना शहरासह ग्रामीण भागात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. असे असताना आता पूर्वीप्रमाणे प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नाही. अनेकांकडे क्वारंटाईनचे शिक्के नाहीत. तर कोरोना रुग्ण हे स्वत:च्या भरवशावर जालन्यातील खासगी तसेच औरंगाबादला जात आहेत. त्यामुळे त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्याऐवजी ते स्वत:च निर्णय घेत आहेत. त्यातच शासकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवण्याऐवजी ते निर्धास्त फिरताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्णवाढीची संख्या ही झपाट्याने वाढत आहे.
चौकट
गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचे चटके अद्यापही जाणवत आहेत. त्यातच पुन्हा रुग्णवाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. एकूणच आवाहन करूनही गर्दी टाळली जात नसल्याने आता पुन्हा एकदा संचारबंदीचा विचार सुरू असून, आता केवळ ती केव्हा लागू करायची, एवढेच बाकी आहे. असे असले तरी ही संचारबंदी सुरू झाल्यावर त्याचा परिणाम कामगारांवर होणार नाही, याचा विचार होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.