जालना शहरातील १८ जणांना कोरोनाची बाधा; रुग्णसंख्या ४२५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:36 AM2020-06-26T11:36:14+5:302020-06-26T11:36:46+5:30
यशस्वी उपचारानंतर २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना : एसआरपीएफच्या सहा जवानांसह शहरातील तब्बल १८ जणांचा अहवाल शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४२५ वर गेली आहे.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून गुरूवारी ७५ स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यात जालना शहरातील १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रूग्णांमध्ये एसआरपीएफचे सहा जवान, नळगल्ली कादराबाद येथील एक १५ वर्षीय मुलगा, सदरबाजार परिसरातील ७८ वर्षीय व्यक्ती, नाथबाबा गल्लीतील ५५ वर्षीय महिला व ६२ वर्षीय पुरूष, खडकपुरा येथील एक ६० वर्षीय महिला, आनंदनगर येथील एक २७ वर्षीय युवक, कल्याणनगर येथील एक महिला व एक पुरूष, मंगल बाजार येथील दोन पुरूष, एक महिला व हकमी नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या आता ४२५ वर गेली असून, त्यातील १३ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.