कोरोनाने घेतला चार जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:30 AM2021-03-05T04:30:39+5:302021-03-05T04:30:39+5:30
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा गुरूवारी मृत्यू झाला, तर गुरूवारीच नवीन १३१ रूग्णांची भर पडली आहे. ...
जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या चार रूग्णांचा गुरूवारी मृत्यू झाला, तर गुरूवारीच नवीन १३१ रूग्णांची भर पडली आहे. रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या ९० जणांना घरी सोडण्यात आले आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ६४ जणांचा समावेश आहे. तर, जोडेगाव- १, शेवगा- ३, अंतरवाला- १, भापकळ- १, कारला- १, नेर- १, हिसवन येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहरातील ३, तळणी- १, किर्ला- १, जयपूर- १, वाघोडा-१, आष्टी-३, घनसावंगी शहर- २, अंतरवाली राठी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड शहरातील चार, झोडेगाव- ३, नांदी- १, भिवंडी भोडखा- १, मठपिंपळगाव- ३, बदनापूर शहर- १, आन्वी- १, दाभाडी- १, घोटण- १, अकोला- १, तुपेवाडी- १, नजीकपांगरी येथील एकाला बाधा झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील बोरगाव मठ- १, माहोरा- १, जानेफळ पंडित- १, मंगरूळ- १, जवखेडा- १, सातेफळ-१, वाढोणा- ४, तोडोळी- १, स्वासनी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहर- १, चिंचोली-१, बरंजळा- १, चांदई-१, आलापूर- ४, मुठोड येथील एकाला बाधा झाली आहे. शिवाय, बुलडाणा जिल्ह्यातील ४ व अहमदनगर जिल्ह्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मयतांची संख्या ४०२ वर
जालना जिल्ह्यात आजवर एकूण १६ हजार २९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनामुळे तब्बल ४०२ जणांचा बळी गेला आहे. तर, यशस्वी उपचारानंतर १४ हजार ७०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
अलगीकरणात ३१ जण
जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ३१ जणांना ठेवण्यात आले आहे. यात जालना शहरातील वन प्रशिक्षण केंद्रात २४ जण तर घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात सात जणांना ठेवण्यात आले आहे.
९२५ जणांवर उपचार
जिल्ह्यात सध्या ९२५ ॲक्टिव्ह रूग्ण असून, त्यांच्यावर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आजवर एक लाख ४२ हजार ३६७ तपासण्या केल्या आहेत. त्यात १६ हजार २९ जण पॉझिटिव्ह आले असून, पॉझिटिव्हिटी रेट ११.२६ वर गेला आहे.