कोरोना प्रतिबंधक लस : मंगळवारी २२७ नागरिकांना टोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:22+5:302021-01-20T04:31:22+5:30
विशेष म्हणजे ही लस आली असली, तरी ती अद्याप सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, ...
विशेष म्हणजे ही लस आली असली, तरी ती अद्याप सर्वसामान्यांना उपलब्ध नाही. परंतु वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, रुग्णवाहिकेचे चालक आदींना ही लस देण्यात येत आहे. ही लस देण्यासाठी या आधीच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी कोविन ॲपवर केली आहे. त्यामुळे आता ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज जाईल, त्यांना ही लस देण्यात येत आहे. यानुसार मंगळवारी ज्यांना मेसेज मिळाला होता, ते कर्मचारी जालन्यातील जिल्हा रुग्णालय, अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालय, परतूर येथील ग्रामीण रुग्णालय आणि भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले.
किरकोळ प्रकारची रिॲक्शन
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ स्वरूपाची चक्कर तसेच काहींना ताप आला होता. त्यांनी लगेचच जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून ही माहिती दिली. ही माहिती मिळताच त्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यांना लगेचच ताप कमी होण्याचे औषध देऊन त्यांचा ताप नियंत्रणात आणण्यात आल्याचे सांगितले. विशेष करून ज्या व्दयींनी म्हणजेच डॉ. पद्मजा सराफ आणि डॉ. संजय जगताप यांचा समावेश होता, त्यांना किरकोळ प्रकारचीही रिॲक्शन आली नसल्याचे त्यांनी नमूद केले.