सामूहिक प्रयत्नांमुळे कोरोनाची साथ आटोक्यात : अर्जुन खोतकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:33 AM2021-09-22T04:33:49+5:302021-09-22T04:33:49+5:30
जालना : रौद्ररूप धारण करत असलेल्या कोविड संसर्गजन्य परिस्थितीत डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, स्वच्छता अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी घेतलेले ...
जालना : रौद्ररूप धारण करत असलेल्या कोविड संसर्गजन्य परिस्थितीत डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, स्वच्छता अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी घेतलेले अथक परिश्रम, समाजसेवक, स्वयंसेवी संस्थांनी केलेले प्रबोधन, दानशुरांनी दिलेली मदत आणि जनतेने घेतलेली काळजी अशा सामूहिक प्रयत्नांमुळे कोविड आजार आटोक्यात आला, असे प्रतिपादन शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
बडी सडकचा राजा गणेश मित्र मंडळाच्या वतीने स्व. किशोर अग्रवाल यांच्या स्मरणार्थ
कोरोना योद्ध्यांचा सत्कार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी
मनीष बगडीया, राजेश अग्रवाल, संजय अग्रवाल, विजय अग्रवाल, रवी अग्रवाल, आदित्य बगडीया, संदीप गिंदोडीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
खोतकर यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा गौरव होत असल्याने त्यांना कार्यासाठी अधिक ऊर्जा मिळेल, असे नमूद करीत बडी सडकचा राजा मित्र मंडळाने राबविलेला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार अर्जुन खोतकर यांनी काढले.
सूत्रसंचालन संदीप गिंदोडीया यांनी केले तर मनीष बगडीया यांनी आभार मानले.
या वेळी डॉ. राजेश सेठिया, डॉ. धीरज छाबडा, डॉ. कैलाश सचदेव, डॉ. अश्विनी म्हस्के, डॉ. गणेश काळे, डॉ. नीलेश नीलमवार, डॉ. संगीता राजे, डॉ. आशिष राठोड, डॉ. कासट, डॉ. प्रियंका, डॉ. जितेंद्र रुणवाल, डॉ. आनंद चोरडिया, डॉ. पद्माकर सबनीस, डॉ. प्रतीक्षा कोटेचा, डॉ. रितेश अग्रवाल, परिचारिका बनसोडे, घोरपडे, ममता भालेराव, छाया वाहुळ, माया सदावर्ते, प्रतीक्षा देशमुख, श्याम लखोटीया, रमेश अग्रवाल, सुशील भावसार, विशाल म्हस्के, कुणाल यांच्यासह कोरोना योद्ध्यांचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
_________________
.