coronavirus : जालन्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:08 AM2020-06-27T11:08:03+5:302020-06-27T11:08:34+5:30
टेंभुर्णीतील १२ जणांचा समावेश
जालना : शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार कोरोनाचे १५ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील १२ जणांचा समावेश आहे.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून जवळपास ४६२ जणांचे स्वॅब शुक्रवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री तब्बल २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर शनिवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार १५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावातील १२ बाधितांमध्ये एका दोन वर्षाच्या मुलीसही एका आठ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. शिवाय रोकडा हनुमान येथील एक, जालना शहरातील बागडीयानगर मधील एक, बागवान मशिद जवळील एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजवर ४६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.