coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:40 PM2020-06-30T12:40:08+5:302020-06-30T12:40:39+5:30

यशस्वी उपचारानंतर ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

coronavirus: 33 people report positive in Jalna district; The number of patients is 554 | coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४

coronavirus : जालना जिल्ह्यात ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ५५४

Next

जालना : जिल्ह्यातील ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली आहे.

जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून सोमवारी ८४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार ३३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात विनायकनगर मधील सात जण, एका हॉटेलमधील तीन, मस्तगड येथील एक, भारतनगर येथील एक, व्यंकटेशनगर येथील एक, जेसीपी बीएएनएल कॉलनीतील एक, बारवार गल्लीतील एक, संभाजीनगर मधील एक, पेन्शनपुरी येथील एक, सत्करनगर येथील एक, अकेली मशिद परिसरातील एक, खाजगी रूग्णालयातील एक, मंगल बाजार येथील एक, नरीमनगर येथील एक, संजोगनगर येथील दोन, वसुंधरानगर येथील तीन जणांसह इतर सहा जणांचा यात समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली असून, यातील १३ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: coronavirus: 33 people report positive in Jalna district; The number of patients is 554

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.