coronavirus : जालन्यात कोरोना बाधितांची संख्या ३५० वर; २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:53 AM2020-06-19T10:53:08+5:302020-06-19T10:54:28+5:30
उपचारानंतर २२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना : शुक्रवारी सकाळी एक दोन नव्हे तब्बल २६ जणांच्या कोरोना स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील २५ जण जालना शहरातील असून, एक बाधित रूग्ण टेंभुर्णी येथील आहे.
जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून ५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला असून, तब्बल २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील २५ जण हे जालना शहरातील आहेत. यात शहरातील खडकपुरा भागातील ६, आनंदनगर भागातील ३, लक्कडकोट भागातील ४, समर्थनगर भागातील २, रामनगर भागातील ५, मंगलबाजार, कन्हैय्यानगर, आरपीरोड, क्रांतीनगर येथील प्रत्येकी एक व एका डॉक्टरचा नातेवाईक अशा २५ जणांचा यात समावेश आहे. तर टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या ३५० वर गेली आहे. कोरोनामुळे आजवर दहा जणांचे बळी केले आहेत. तर उपचारानंतर २२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.