coronavirus : जालना जिल्ह्यात आज ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४४८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:20 PM2020-07-20T12:20:18+5:302020-07-20T12:20:51+5:30
उपचारानंतर ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जालना : जिल्ह्यातील ४९ जणांचा कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील ३९ जणांचा समावेश आहे.
प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या ९२ पैकी ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील संभाजीनगर १४, लक्कडकोट ३, रामनगर ३, जिल्हा रूग्णालय परिसर २, गणपती गल्ली २, रूक्मिणी नगर २, दु:खीनगर १, आर.पी. रोड १, ग्रीन पार्क १, पुष्पकनगर १, भाग्यनगर १, गांधीनगर १, पाणीवेस १, दुर्गावेस १, महालक्ष्मी अपार्टमेंट १, भारतमाता मंदिर १, गुडला गल्ली १, समर्थनगर १, तर निलकांतनगर मधील एक अशा ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अंबड शहरातील १, अंबड तालुक्यातील शिवना १, जालना तालुक्यातील सेवली १, पिंपळगाव (स.)१, भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को १, केदारखेडा १, बदनापूर शहरातील १, बदनापूर अकोला (नि.) येथील २ व लोहा (जि.नांदेड) येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता १४४८ इतकी झाली आहे. त्यातील ५४ जणांचा बळी गेला असून, यशस्वी उपचारानंतर ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.