coronavirus : जालना जिल्ह्यात सहा बाधित रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:12 AM2020-05-24T11:12:58+5:302020-05-24T11:13:38+5:30
४७ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना : जिल्ह्यातील सहा जणांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. यात अंबड येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील तिघांसह जालना शहरातील दोघे व तालुक्यातील निरखेडा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या १०८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील सहा जणांचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. यात अंबड येथील कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तीन नातेवाईकांचा समावेश आहेत. त्यात एका पुरूषासह दोन महिलांचा समावेश आहे. तर शहरातील खाजगी रूग्णालयातील एका महिला कर्मचाºयाचा, जालना शहरातील पुष्पकनगर येथील एका पुरूषाचा व जालना तालुक्यातील निरखेडा येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर सहा जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६० वर गेली असून, त्यातील १३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित ४७ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.