जालन्यात कोरोनाचा पहिला बळी; परतूरमधील मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 10:12 AM2020-05-31T10:12:09+5:302020-05-31T10:15:49+5:30
२९ मे रोजी परतुरच्या संशयित व्यक्तीचा मृत्यू
जालना: परतूर तालुक्यातील मापेगाव येथे ठाणे येथून आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू 29 मे रोजी झाला होता. त्या मृत रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी आहे.
जिल्ह्यात एकूण 123 कोरोना रुग्ण असून यांपैकी 45 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाने मृत्यू झाल्याने परतूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परतूर तालुक्यातील मापेगाव (बु.) पुनर्वसन येथे १९ मे रोजी एक व्यक्ती मुंबईहून आला होता. त्याला गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. २९ मे रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जालना येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) त्याला ठेवण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.