coronavirus : जालना @ ७१; खाजगी रुग्णालयातील ५ कर्मचाऱ्यांसह १० जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 09:04 AM2020-05-25T09:04:04+5:302020-05-25T09:04:40+5:30
जालना जिल्ह्यात दहा बाधित; रूग्णसंख्या ७१ वर
जालना : शहरातील एका खासगी रूग्णालयातील पाच कर्मचा-यांसह एकूण दहा जणांचे कोरोना अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. परिणामी जिल्ह्यातील रूग्णसंख्या आता ७१ वर गेली असून, त्यातील कोरोनामुक्त झालेल्या १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात रविवारी दिवसभरात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दिवसभरात कोरोनामुक्त दोघांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर १०६ जणांचे अहवाल प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील दहा जणांचा अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. यात जालना शहरातील एका खासगी रूग्णालयातील पाच कर्मचा-यांचा समावेश आहे. जालना तालुक्यातील पिरनेर येथील दोन, मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा, कानडी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा यात समावेश आहे.