coronavirus : जालन्यात तिघांचा मृत्यू; २३ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 07:43 PM2020-07-18T19:43:05+5:302020-07-18T19:43:57+5:30

रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या तब्बल ६४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus In Jalana: three die; 23 people infected | coronavirus : जालन्यात तिघांचा मृत्यू; २३ जणांना बाधा

coronavirus : जालन्यात तिघांचा मृत्यू; २३ जणांना बाधा

Next

जालना : जालना शहरातील कोरोनाबाधित दोन रूग्णांचा शुक्रवारी रात्री तर एका रूग्णाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे. तर शनिवारी २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १२८१ वर गेली आहे.

शहरातील जेपीएस बँक कॉलनी भागातील एका ८० वर्षीय व्यक्तीस ८ जुलै रोजी, भीमनगर परिसरातील एका ५२ वर्षीय व्यक्तीला १२ जुलै रोजी तर गोपालपुरा परिसरातील ५० वर्षीय व्यक्तीला १४ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या तिन्ही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यातील दोन रूग्णांचा शुक्रवारी रात्री तर गोपालपुरा भागातील व्यक्तीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला.  तर दुसरीकडे २३ जणांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कन्हैय्यानगर भागातील १२, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील २, गोपालपुरा येथील ३ (एक मयत), मोदीखाना १, मुर्गीतलाव १, आव्हाना २, धावडा १, बदनापूर १ अशा २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या तब्बल ६४ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये प्रियदर्शनी कॉलनीतील १, गोपीकिशननगर १, कालीकुर्ती १, समर्थनगर १, कन्हैय्यानगर १, लक्कडकोट १,  सतकर नगर १, अमित हॉटेलजवळ १, हकीम मोहल्ला १, तुळजाभवानी नगर २, चार्वापुरा १,  दु:खीनगर १, संभाजीनगर १, कुंभार गल्ली १, कादराबाद ४, पानीवेस २, नूतन वसाहत १, साईनगर ४, जिजामाता कॉलनी २, रामनगर ६, मोदीखाना २, गांधीनगर १३, कॉलेजरोड १, जाफराबाद १, मंठा १, अंबड १, दहिपुरी ३,  चिंचखेड १, कुंभार पिंपळगाव २, घनसावंगी ४, भोकरदन १ अशा एकूण ६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मयतांची संख्या ५४ वर
जिल्ह्यात आजवर १२८१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील ५४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ८२० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
 

Web Title: Coronavirus In Jalana: three die; 23 people infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.