coronavirus : जालन्यात एकाच दिवशी ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:51 PM2020-05-28T19:51:09+5:302020-05-28T19:51:38+5:30
एसआरपीएफचा एक जवान, एक होमगार्ड यांच्यासह १३ महिला व १७ पुरूषांचा समावेश
जालना : जालन्यात गुरूवारी एकाच दिवशी सर्वाधिक ३० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. यात एसआरपीएफचा एक जवान, एक होमगार्ड यांच्यासह १३ महिला व १७ पुरूषांचा समावेश आहे. परिणामी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११५ वर गेली आहे.
गुरूवारी सकाळी प्राप्त अहवालात २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात जालना शहरातील संस्थात्मक अलगीकरण कक्षातील मधील सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. बदनापूर येथील एक ३३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बाधित आला आहे. अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील सहा जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. अंबड येथील शारदानगर भागातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. जालना तालुक्यातील कातखेडा येथील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. तर एसआरपीएफच्या एका जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील सामनगाव येथील एका होमगार्डचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
गुरूवारी सायंकाळी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संस्थात्मक अलगीकरण कक्षातील एक महिला, एक पुरूष, जालना तालुक्यातील नूतनवाडी येथील एक महिला, मंठा तालुक्यातील कानडगाव येथील एक व्यक्ती तसेच परतूर तालुक्यातील डोलहरा येथील एका महिलेचा यात समावेश आहे. जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११५ वर गेली आहे. तर २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.