CoronaVirus : जालनेकरांच्या चिंतेत भर; चार एसआरपीएफ जवान, एक डॉक्टर पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 10:24 PM2020-05-15T22:24:48+5:302020-05-15T22:25:33+5:30

एकूण रुग्णांपैकी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

CoronaVirus: Jalnekar's worries; Four SRPF jawans, one doctor positive; total 23 patients | CoronaVirus : जालनेकरांच्या चिंतेत भर; चार एसआरपीएफ जवान, एक डॉक्टर पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २३ वर

CoronaVirus : जालनेकरांच्या चिंतेत भर; चार एसआरपीएफ जवान, एक डॉक्टर पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या २३ वर

Next

जालना : मालेगाव येथून आलेल्या चार जवानांसह जालना येथील एका खासगी रूग्णालयातील डॉक्टराला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री समोर आले आहे. एकाच वेळी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या २३ वर गेली असून, यातील सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोविड रूग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या दोन महिलांना शुक्रवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. महिलांना डिस्चार्ज मिळाल्याने सर्वत्र दिलासादायक वातावरण होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मालेगाव येथून आलेल्या आणि भोकरदन येथे क्वारंटाइन करण्यात आलेल्या चार जवानांचा समावेश आहे. तर जालना शहरातील एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

गेल्या दोन दिवसांमध्ये कोविड रूग्णालयातील एक महिला डॉक्टर आणि आता एका खासगी रूग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली असून, यापूर्वी कोविड रूग्णालयातीलच एका परिचारिकेलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: CoronaVirus: Jalnekar's worries; Four SRPF jawans, one doctor positive; total 23 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.