coronavirus : जालन्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ९७ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 11:24 PM2020-09-01T23:24:42+5:302020-09-01T23:25:41+5:30

जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८०८ वर गेली आहे

coronavirus: Nine coronavirus patients die in Jalana ; An increase of 97 patients | coronavirus : जालन्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ९७ रुग्णांची वाढ

coronavirus : जालन्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू; ९७ रुग्णांची वाढ

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणा-या नऊ कोरोनाबाधित रूग्णांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४८०८ वर गेली असून, त्यातील १४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील शकुंतला नगर भागातील ७५ वर्षीय व्यक्ती, शेरसवार नगर मधील ९० वर्षीय व्यक्ती, खाजगी रूग्णालयातील ६८ वर्षीय व्यक्ती, जुना जालना भागातील ७५ वर्षीय व्यक्ती, टेलिकॉम कॉलनीतील ६१ वर्षीय महिला, साईनगर भागातील ६३ वर्षीय व्यक्ती, आखा (ता.परतूर) येथील ६५ वर्षीय महिला, घनसावंगी येथील ५५ वर्षीय व्यक्ती व मेहकर (जि.बलडाणा) येथील ५४ वर्षीय महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर मंगळवारी ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील पोलीस मुख्यालयातील १, साईनगर १, मधुबन कॉलनी १, जालना शहर १, घायाळ नगर १, आनंदस्वामी गल्ली १, रामनगर ढोरपुरा १, आयोध्यानगर १, जिल्हा महिला रूग्णालयातील २, लक्कडकोटमधील २, चंदनझिरा भागातील १, कुंभार गल्ली १, सोनलनगर १, सकलेचानगर २,निलम नगर १ अशा एकूण १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अंबडमधील २, टेंभूर्णी १, देऊळगाव राजा १, टाकरवन १, जामवाडी ३, घोटन १, मांडवा ३, शेगाव १, घनसावंगी २, पिंपळवाडी १, मेहकर १, राजूर १, वाघू्रळ २, कंडारी ४, दुसर बीड १, मंठा १, गोंदेगाव १, बठण २, सिंदखेडराजा १, रांजणी १ व भोकरदन येथील एक अशा एकूण ५१ जणांचा आरटी पीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटिजन तपासणीत ४६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जालना जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४८०८ वर गेली असून, त्यातील १४८ जणांचा बळी गेला आहे. तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर ३५०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: coronavirus: Nine coronavirus patients die in Jalana ; An increase of 97 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.