coronavirus : जालन्यात कोरोनाचा नववा बळी; सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 11:28 AM2020-06-17T11:28:56+5:302020-06-17T11:29:25+5:30
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा रूग्णालयातील एका डॉक्टरांसह सहा जणांचा समावेश आहे.
जालना : तालुक्यातील जामवाडी येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला होता. त्या मयताच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनामुळे आजवर जिल्ह्यात नऊ जणांचा बळी गेला आहे. बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा रूग्णालयातील एका डॉक्टरांसह सहा जणांचा समावेश आहे. तर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा रूग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी, एसआरपीएफ क्वॉर्टरमधील एक ५१ वर्षीय व्यक्ती, भाग्यनगर मधील एक ६५ वर्षीय महिला, जामवाडी येथील एक ६० वर्षीय पुरूष (मयत), जाफराबाद शहरातील एक २ वर्षीय मुलाचा यात समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता ३१५ वर गेली आहे. तर कोरोनामुळे ९ जणांचा बळी गेला असून, १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.