coronavirus : चिंताजनक ! जालन्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५०१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 02:20 PM2020-07-21T14:20:34+5:302020-07-21T14:20:56+5:30

आजच्या कोरोनाबाधितांमध्ये ४९ रूग्ण हे जालना शहरातील आहेत.

coronavirus: Worrying! The number of corona patients in Jalna is 1501 | coronavirus : चिंताजनक ! जालन्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५०१ वर

coronavirus : चिंताजनक ! जालन्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५०१ वर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जालना : जिल्ह्यातील ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार समोर आले आहे. 

यात ४९ रूग्ण हे जालना शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता तब्बल १५०१ वर गेली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील मोदीखाना ८, मालीपुरा ७, सदरबाजार ६, रामनगर ५, गोपीकिशन नगर ५, महिला रूग्णालय क्वार्टर २, दु:खीनगर २, गुडला गल्ली २, राणानगर २, नळगल्ली १, जिजामाता कॉलनी १, अमरेलनगर १, विनकर कॉलनी १, गोपालपुरा १, प्रशांतीनगर १, स्वामी दयानंद रोड १, वसुंधरानगर १, ओमशांती नगर १, नाथनी पेट्रोल पंपासमोर १ अशा ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर घनसावंगी तालुक्यातील यावलपिंपरी १, हडप सावरगाव १, जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा १ व परतूर येथील एकालाही कोरोनाची बाधा झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता  १५०१ झाली असून, त्यातील ५४ जणांचा बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ८९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: coronavirus: Worrying! The number of corona patients in Jalna is 1501

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.