बाप्पांच्या विसर्जनासाठी पालिका आपल्या दारी : ३२ वाहनांची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:48+5:302021-09-18T04:32:48+5:30
जालना जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक गणपतींची स्थापना करण्यात आली असून, त्यात जवळपास २७५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना ...
जालना जिल्ह्यात एक हजारपेक्षा अधिक गणपतींची स्थापना करण्यात आली असून, त्यात जवळपास २७५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.
चौकट
पालिकेकडून तयारी पूर्ण
जालना पालिकेने गणपतीच्या मूर्ती एकत्रित करून त्यांचे विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार शहरातील विविध भागांत रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी १२ वाजेनंतर या सर्व रिक्षा शहरात फिरून मूर्तींचे संकलन करतील. यात दोन ट्रकची व्यवस्था करण्यात आली आहे.
नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी जालना न.प.
चौकट
बँड, ढोल पथकांचा वाजला बँड
गेल्या दोन वर्षांपासून गणपती मिरणूक, तसेच लग्नसमारंभ आणि महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त बँड तसेच ढोल-ताशे, वाजंत्री यांना मोठी मागणी असते; परंतु कोरोनामुळे मिरवणुकीवरच बंदी असल्याने बँड वाजविणाऱ्यांसह युवकांनी पुण्याच्या धर्तीवर सुरू केलेले ढोल-पथकांनाही कुठलीच ऑर्डर नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासाठी किमान बँडवाल्यांना अन्य उद्योगांप्रमाणे विशेष पॅकेज देण्याची मागणी होत आहे.