कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:52 AM2018-12-31T00:52:15+5:302018-12-31T00:53:11+5:30

बोंडअळीसाठी कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.

'Cotton Schrader' machine; remedy for Pink bollworm | कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन

कृषी विभागाकडून ‘कॉटन श्रेडर’च्या माध्यमातून बोंडअळीचे उच्चाटन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बोंडअळीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या मदत करण्यासाठी म्हणून कृषी विभाग सरसावला असून, यासाठी कामगंध सापळे वापरानंतर आता कॉटन श्रेडर या नवीन यंत्राचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असून, दुसरीकडे या यंत्रणाचा वापर शेतातील पळाटी काढण्यासाठी होणार असल्याची माहिती कृषी अधीक्षक विजय माईनकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षापासून गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर उपाययोजना करण्यात आल्या. मात्र आजही ही बोंड अळी दबा धरून बसली आहे. यात विशेष करून फरदड कापसाच्या माध्यमातून बोंड अळीला संजीवनी मिळू श्कते.त्यामुळे शेतातील पळाटीची कापणी करून त्याचा अक्षरश: भुगा केला जातो. यासाठी कॉटन श्रेडर ही महत्वाची भूमिका निभावत असल्याचे माईनकर म्हणाले.
जालना जिल्ह्यातील शेतक-यांनाही हे यंत्र खेरदी करण्यासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यातच हे यंत्र त्याच शेतक-यांना देण्यात येणार आहे, ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
यासाठी कृषी अधीक्षक कार्यालयात संपर्क साधून शेतक-यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे माईनकर यांनी नमूद केले. याचे प्रात्यक्षिक सध्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असल्याचेही माईनकर यांनी सांगितले.

Web Title: 'Cotton Schrader' machine; remedy for Pink bollworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.