अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:23 AM2019-06-27T00:23:52+5:302019-06-27T00:24:08+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने वाळू साठ्यांची पाहणी केली होती. राजू कुरणकर, प्रल्हाद राक्षे, नीलेश कुरणकर, आवळजी सोळनकर, आसमान राक्षे, भरत कुरणकर, बाबूराव वाढेकर, शंकर पवार, बाळू कुरणकर, अशोक राक्षे, सुरेश राक्षे, दादासाहेब सुलनकर, ऋषिकेश राक्षे (सर्व रा. कुरण ता. अंबड) भरत भुमरे, बबन फुलारे, रा. पाथरवाला, अमोल पंडित (रा. महांकाळा ता. अंबड) यांच्या विरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
दरम्यान, एलसीबीच्या या कारवाईमुळे बुधवारी वाळू उपशावर परिणाम झाल्याचे परिसरात दिसून आले.