लाच प्रकरणी जमादराविरूध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:31 AM2018-12-15T00:31:04+5:302018-12-15T00:32:18+5:30

तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यातील जमादार मंडाळे यांना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime against the accused in the bribe case | लाच प्रकरणी जमादराविरूध्द गुन्हा

लाच प्रकरणी जमादराविरूध्द गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देगोंदी : गुन्ह्यात मदत करण्यासाठी माघितली ४० हजारांची लाच

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/गोंदी : तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी गोंदी पोलीस ठाण्यातील जमादार मंडाळे यांना तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लूचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदारसह त्याच्या मुलाविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास जमादार मंडाळे यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, विनाकारण मारहाण न करण्यासाठी मंडाळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाच लूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी गुंडेवाडी ते गोंदी मार्गावर जावून पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोड करुन मंडाळे हे ४० हजार रुपये स्विकारण्यास तयार असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर १० डिसेंबर रोजी सापळा लावला असता, मंडाळे यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गोंदी पोलीस ठाण्यात मंडाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Crime against the accused in the bribe case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.