नायब तहसीलदारांसह तलाठ्याविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:15 AM2020-02-07T01:15:29+5:302020-02-07T01:15:49+5:30

वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against talathi along with Nayab Tehsildar | नायब तहसीलदारांसह तलाठ्याविरुध्द गुन्हा

नायब तहसीलदारांसह तलाठ्याविरुध्द गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : वाळू वाहतुकीचा परवाना असताना वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून नियमबाह्य कारवाई केल्याप्रकरणात दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून नायब तहसीलदार केशव डकले, तलाठी अमोल जाधव यांच्याविरूध्द बुधवारी रात्री जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा गौण खनिज अधिकारी जालना यांनी पीरकल्याण येथील गौण खनिज परवाना दिला आहे. २१ जानेवारी रोजी फिर्यादी राजू जगताप यांच्याकडे त्यांच्या मालकीचे टिप्पर घेऊन चालक कृष्णा लिंबाजी बकाल हे बुलडाण्याकडे वाळू घेऊन जात होते. भराज बुद्रूक (ता.जाफराबाद) येथे महसूल पथकाने टिप्पर थांबविले. चालकाने कागदपत्रे दाखविल्यानंतरही ते वाहन जाफराबाद तहसील कार्यालयात नेण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर अधिकाऱ्यांनी नियमानुसार तीन लाख रूपये दंड होतो, आम्हाला एक लाख रूपये द्या, तुमचा टिप्पर सोडतो, असे म्हटले.

Web Title: Crime against talathi along with Nayab Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.