स्थानिक गुन्हे शाखेची गोदापात्रात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:32 AM2018-11-05T00:32:10+5:302018-11-05T00:32:27+5:30
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारा हायवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडून जप्त करुन चालक मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणारा हायवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडून जप्त करुन चालक मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आला आहे.
दोन दिवसांपूर्वी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी वाळूमाफियांना आवर घालण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेला दोन दिवस उलटत नव्हे तोच रविवारी सर्रासपणे वाळू उपसा सुरु होता. प्रत्येकवेळेस महसूल विभागापेक्षा पोलीस प्रशासन जास्त वाळूमाफीयांच्या विरोधात चालू असताना महसूल विभाग कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे.
रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुपारी गोदापात्रातून चोरट्यामार्गाने वाळू वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम़ एच. २०, एफ. जी.९४३६ पकडून गोंदी पोलीस ठाण्यात चालक मुरलीधर भालेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन हायवा जप्त केला आहे. या पोलीसांच्या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाहतूक करणा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.