दहा हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:38 AM2019-01-01T00:38:10+5:302019-01-01T00:38:42+5:30
लाचलुचपत विभागाने सापळा रचून चौधरी याने लाचेची मागणी केल्याचे पंचासमोर सिध्द झाल्यानंतर चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अंबड येथील भूमिअभिलेख कार्यालयात असलेल्या सर्व्हेअर बबन चौधरी याने शेतकऱ्याचा अहवाल उपविभागीय अधिकाºयाकडे पाठविण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीनंतर दहा हजार रुपये दिल्यावर शेतजमिनीचा अहवाल पाठविण्याचे ठरले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अंबड तालुक्यातील कासारवाडी येथील शेतक-याने चौधरी विरुध्द लाच मागितल्याची तक्रार दाखल केली. यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचून चौधरी याने लाचेची मागणी केल्याचे पंचासमोर सिध्द झाल्यानंतर चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कासारवाडी येथील शेतक-याची जमीन पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्याची मोजणी सर्व्हेअर बबन चौधरी याने केली होती. मोजणी केल्यानंतर सदर अहवाल अंबड येथील उपविभागीय अधिका-याकडे दाखल केल्यावर संबंधित शेतक-याला मावेजा मिळू शकतो. परंतु चौधरी याने एसडीएम कडे अहवाल पाठविण्यासाठी शेतक-याकडे पंधरा हजार रुपये मागितले होते. पैकी दहा हजार रुपये देण्याचे नक्की झाले. त्यावरुन चौधरी विरुध्द लाच मागितल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस.आर.जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, अशोक टेहरे, प्रदीप दोंडे, संतोष धायडे, संजय उदगिरीकर, रामचंद्रकुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के यांनी पार पाडली.