शहागड येथील आरोपी वर्षभरासाठी स्थानबध्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 01:06 AM2019-09-19T01:06:05+5:302019-09-19T01:06:26+5:30
शहागड (ता.अंबड) येथील शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : विविध गुन्ह्यांत आरोपी असलेल्या शहागड (ता.अंबड) येथील शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री झोपडपट्टी गुंड कायद्यांतर्गत वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
जमालोद्दीन तांबोळी याच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत ज्या-ज्या व्यक्तीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशांना ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी सपोनि शिवानंद देवकर यांच्या मदतीने तयार केला होता. पोलीस अधीक्षकांच्या शिफारशीने हा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश जारी केल्यानंतर शेख जमालोद्दीन नूर मोहम्मद तांबोळी याला मंगळवारी ताब्यात घेऊन औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबध्द करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सी.डी.शेवगण, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, सपोनि शिवानंद देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, तीर्थपुरी चौकीचे उपनिरीक्षक नागरगोजे, गोपनीय शाखेचे पो. कॉ.महेश तोटे, बाबा डमाळे, योगेश दाभाडे, अख्तर शेख, मुंढे, निकम आदींच्या पथकाने केली.