२०१८ चा पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:11+5:302021-07-30T04:32:11+5:30

संघर्ष समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हा परिषद सदस्य तथा परतूर तालुका पीक विमा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी बाप्पा ...

Crop insurance for 2018 should be given to farmers | २०१८ चा पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा

२०१८ चा पीकविमा शेतकऱ्यांना द्यावा

Next

संघर्ष समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना जिल्हा परिषद सदस्य तथा परतूर तालुका पीक विमा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी बाप्पा सोनवणे म्हणाले की, २०१८ मध्ये जिल्ह्यातील नऊ लाख ७५ हजार शेतकऱ्यांनी २५० कोटी रुपयांचा पीक विमा भरला होता. आय. सी. आय. सी. आय. लॅमबोर्ड ही कंपनी पीक विमा एजन्सी चालवत होती. याची संरक्षित रक्कम एक हजार ३५२ कोटी रुपये होते. कंपनीने केवळ ५५ कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देणार म्हणून एकशे एक कोटी रुपये दिले, असे सांगितले आहे. मात्र, अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा मिळवून द्यावा. अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा या पीक विमा संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Crop insurance for 2018 should be given to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.