पीक कर्जापासून अद्यापही वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:21 AM2018-11-13T00:21:32+5:302018-11-13T00:22:02+5:30
खरीप पीक संपले. मात्र अजूनही भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी येथील शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलगाव : खरीप पीक संपले. मात्र अजूनही भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी येथील शाखेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले गेले नाही. यामुळे खादगाव, जवसगाव, दरेगाव येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
अगोदरच दुष्काळ असल्यामुळे बदनापूर तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे. यामुळे खादगाव, जवसगाव, दरेगाव या गावांसाठी दत्तक असलेल्या नागेवाडी शाखेत शेतकरी जुलै महिन्यापासून पिक कर्जासाठी चकरा मारित आहेत. परंतु, बँक अधिका-यांच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे अद्यापही ते पिक कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.
बँकेत पूर्णवेळ फील्ड आॅफिसर नसल्यामुळे शेतक-यांकडून कर्जासाठी लागत असलेले कागदपत्रे जमा करून पुढच्या आठवड्यात या असे सांगितले जात आहे. चार महिन्यांपासूनही कर्ज मिळत नसल्याने शेतक-यांमधून रोष व्यक्त केला जात आहे.