तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:40 AM2020-12-30T04:40:43+5:302020-12-30T04:40:43+5:30
मंठा : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी शहरातील बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे ...
मंठा : तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी शहरातील बँकांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे अनुदान काढण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
प्रशासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यापासून बँक आणि प्रशासकीय कार्यालयात कामाचा बोजवारा उडाला आहे. शासनाने कामाच्या वेळा वाढविल्या असल्या तरी कर्मचारी वेळेवर कार्यालयात येताना दिसत नाहीत. याचा परिणाम कामावर होत असून, कुठलीच कामे पूर्ण होत नाहीत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भोंगळ कारभार सुरू आहे. ठराविक खातेदारांनाच पैसे दिले जात आहेत. काही शेतकऱ्यांना तासन्तास उभे केले जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी सुभाष घारे यांनी केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशावरून आम्ही गावांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे अनुदान वाटप केले जात आहे. तीन दिवस सुट्या असल्याने अनुदान वाटप करता आले नाही, असे बँकेच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.
फोटो
मंठा शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.