पपईच्या शेतात गांजाची लागवड; १५ किलो गांजा जप्त, शेतकऱ्याविरोधात गुन्हा
By विजय मुंडे | Published: August 28, 2023 07:29 PM2023-08-28T19:29:29+5:302023-08-28T19:30:11+5:30
जालना शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.
जालना : पपईच्या शेतात लागवड केलेला दोन लाख १८ हजार रूपयांचा १६.६६ किलो गांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी राहेरा (ता.घनसावंगी) शिवारात करण्यात आली.
घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारातील एका शेतात विना परवाना गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सोमवारी सकाळी राहेरा शिवारातील शेतात कारवाई केली. त्यावेळी पपईच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पथकाने पंचनामा करून त्या ठिकाणाहून दोन लाख १५ हजार रूपये किमतीचा १६.६६ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याविरूद्ध एनडीपीएस कायदा १९८५च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अधीक्षक पाराग नवलकर, भरारी पथकाचे प्र. निरीक्षक एम.एन. झेंडे, गणेश पुसे, भि.सू.पडूळ, बी.के. चाळणेवार, बी.ए. दौंड, पी.बी. टकले, व्ही.पी. राठोड, आर.ए.पल्लेवाड, ए.आर. बिजुले, व्ही.डी. पवार, एस.जी. कांबळे, व्ही.डी. अंभोरे, के.बी.काळे, आर.आर. पंडित, फौजदार सतिश दिंडे, एस.जी. देवडे, एस.बी.माळी, व्ही.एस. पवार यांच्या पथकाने केली. तपास निरीक्षक एम.एन. झेंडे हे करीत आहेत.
अवैध गांजा विक्रीचे काय
जालना शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. एका शेतात कारवाई करून गांजा पकडण्यात आला आहे. परंतु, अवैधरित्या राजरोस गांजाची विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष का करीत आहेत असा सवाल आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केला आहे.