दरोडेखोर श्रीकांत जाधव दोन वर्षांकरिता हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:18 AM2017-12-25T01:18:55+5:302017-12-25T01:19:00+5:30
दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील श्रीकांत मोकिंदा जाधव (२७,रा. कैकाडी मोहल्ला) यास जालना, औरंगाबाद, परभणी व बुलडाणा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरोडे, खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील श्रीकांत मोकिंदा जाधव (२७,रा. कैकाडी मोहल्ला) यास जालना, औरंगाबाद, परभणी व बुलडाणा जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या प्रस्तावानंतर उपविभागीय दंडाधिका-यांनी हद्दपारीच्या कारवाईचे आदेश काढले.
जाधववर चोरी, हाणामा-या, दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कुणी पुढे येत नव्हते.