'नऊ दिवसांपासून पप्पा उपाशी, काळजी वाटतेय'; मनोज जरंगेंच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 04:09 PM2023-09-06T16:09:05+5:302023-09-06T16:09:25+5:30
मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे.
जालना- मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. दोन दिवसापूर्वी आंदोलकांवर लाठीचार्जही झाला, यामुळे आंदोलनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे, गेल्या नऊ दिवसापासून मनोज जरंगे यांचे आंदोलन सुरू आहे, अन्नाचा घेतलेले नाही. यामुळे आता त्यांची तब्येत खालावली आहे. आज सकाळी त्यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता त्यांच्या कुटुंबीयांनीही चिंता व्यक्त केली आहे.
मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू
एका वृत्तवाहिनीला मनोज जरंगे यांच्या कुटुंबीयांनी मुलाखत दिली आहे. यात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडिलांनी चिंता व्यक्त केली आहे. मनोज जरंगे यांचा मुलगा शिवराज यावेळी बोलताना म्हणाला, 'पप्पांची काळजी वाटतं आहे, गेल्या नऊ दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. आपला समाज गेल्या कित्येक दिवसापासून लढत आहे, आता पप्पांना मला सांगायच आहे आरक्षण घेऊया. आमचा आमच्या पप्पांना पाठींबा आहे, असंही तो म्हणाला.
यावेळी मनोज जरंगे यांचे वडिल रावसाहेब जरंगेही उपस्थित होते. ते म्हणाले, मी मनोजला चार एकर जमीन दिली होती, त्याने तीन एकर शेती समाजासाठी विकली आहे. त्याने गेल्या कित्येक दिवसापासून समाजासाठी आंदोलन, काम करत आहे, असंही जरंगे म्हणाले.
यावेळी मनोज जरंगे यांच्या पत्नीनेही काळजी व्यक्त केली आहे. पत्नी सुमित्रा म्हणाल्या, मी आमच्या कुटुंबीयांचा दबाव देणार नाही. ते मराठा आरक्षण घेऊन येतील, असंही म्हणाल्या.
मनोज जरंगेंची तब्येत खालावली, सलाईनद्वारे उपचार सुरू
मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. यावरून राज्यातील वातावरण तापले होते. काल मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या शिष्टमंडळाला आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांनी चार दिवसांची मुदत दिली आहे. जरांगे उपोषणावर ठाम असून चार दिवसांत जीआर न निघाल्यास पाण्याचाही त्याग करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते. आता जरांगे यांची प्रकृती काहीशी खालावली आहे.
शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आणखी वेळ कशाला पाहिजे. चार दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमोर मांडली होती. आता जरांगे यांची हेल्थ अपडेट आली आहे.