रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:05 AM2019-02-18T01:05:53+5:302019-02-18T01:06:17+5:30

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.

Danapur in darkness due to burning fire | रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

रोहित्र जळाल्याने दानापूर अंधारात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दानापुर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील तीन महिन्यांपासून रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य आहे. यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
येथील जिल्हा परिषद शाळा जवळील रोहित्र गेल्या तीन महिन्या पासून जळाले होते. यामुळे गावातील इतर रोहित्रावरुन आकडे टाकून ग्रामस्थांनी जोडणी केली होती. यामुळे गावातील दुसरे रोहित्र जळाल्याने गावात ९० टक्के गाव अंधारात बुडाले आहे. सध्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना गावात अंधार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार मागणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. वीज गायब झाल्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. गावात केरोशिन मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या गैरसोयीत भर पडली आहे. तांत्रिक साहित्याअभावी ही स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Danapur in darkness due to burning fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.