धोकादायक डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:28 AM2021-03-08T04:28:39+5:302021-03-08T04:28:39+5:30
प्रवाशांची गैरसोय भोकरदन : राज्य परिवहन महामंडळाच्या भोकरदन आगारातून सुटणाऱ्या अनेक बसेस अवेळी सुटत आहेत. बसेस वेळेत सुटत नसल्याने ...
प्रवाशांची गैरसोय
भोकरदन : राज्य परिवहन महामंडळाच्या भोकरदन आगारातून सुटणाऱ्या अनेक बसेस अवेळी सुटत आहेत. बसेस वेळेत सुटत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसेस वेळेत सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात खुलेआम जुगार खेळला जात आहे. ऑनलाईन जुगारही ग्रामीण भागात जोमात सुरू आहे. युवापिढी जुगारामुळे व्यसनाधीन होत असून, प्रशासनाने कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
वाहतूक सिग्नल बंदच
जालना : शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविलेले वाहतूक सिग्नल बंद पडले आहेत. सिग्नल नसल्याने अनेक चालक नियम मोडून वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बंद सिग्नल सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
बाजारात शुकशुकाट
पारडगाव : कोरोनामुळे पारडगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे या बाजारात शुकशुकाट दिसून आला.