कमकुवत खांबासह विजेच्या तारा बनल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:17 AM2018-11-14T00:17:14+5:302018-11-14T00:17:32+5:30
रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील रेवगाव येथे विद्युत खांबाला जागोजागी छिद्र पडल्याने खांब धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गेल्या अनेक वर्षापासून गावातील विद्युत खांब, विजेच्या तांराची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे तारा कमकुवत झाल्याने धोका निर्माण होण्याची भीती आहे. याअनुषंगाने ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणला ग्रामपंचायतीकडून निवेदन देऊन े खांबासह वीजेच्या तारा बदलण्याची मागणी सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केली
दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद शाळेजवळील वीजेची तार वीजपुरवठा सुरू असताना तुटून खाली पडली सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. गावठाण मधील वीजपुरवठा करणारे खांब आणि वीजेच्या तारा कित्येक वर्षांपासूनच्या आहेत खांब आणि वीजेच्या तारा कमकुवत झाल्या आहेत .जिल्हा परिषद शाळेजवळ तसेच रेवगाव दुधनाकाळेगाव गावातून जाणार्या रस्त्यावरील खांबासह वीजेच्या तारा फारच धोकादायक बनल्या आहेत महावितरणने वेळीच लक्ष घालून खांबासह वीजेच्या तारा बदलून घ्याव्यात अशी मागणी ही ग्रामस्थाच्या वतीने सरपंच नर्मदाबाई जनार्धन गोल्डे यांनी केली आहे विद्युतपुरवठा सुरू असताना नागरिकांना येथे वावरत असताना जीव मुठीत धरून वावरावे लागते वेळीच खांबासह वीजेच्या तारा बदलून देण्याची मागणी होत आहे.