गुरूदेव दत्तच्या जयघोषात दत्तोजन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:41 AM2020-12-30T04:41:25+5:302020-12-30T04:41:25+5:30
जुना जालना भागातील नरीमान नगर येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच तुळजाभवानी मंदिर परिसरातील केंद्र, भालेनगरीतील स्वामी ...
जुना जालना भागातील नरीमान नगर येथील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच तुळजाभवानी मंदिर परिसरातील केंद्र, भालेनगरीतील स्वामी समर्थ केंद्रासह मस्तगड येथील महानुभाव दत्त मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
सायंकाळी सहा वाजता गणपती गल्ली स्थित दत्त मंदिरात दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी पाळणा गाऊन जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला. दरवर्षी निघणारी पालखी मिरवणूक यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुधाकर लोखंडे , विनायक महाराज फुलंब्रीकर, व्ही.आर. अनाईक, धनंजय याडीकर, डॉ. श्रीपाद देशपांडे, प्रकाश वडगावकर यांनी सांगितले. जालना तालुक्यातील खणेपुरी तसेच घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी तसेच पांचाळेश्वर मंदिरात मोठ्या भक्तीभावाने जन्म सोहळा पार पडला.
जाफराबादेत दत्त जन्म
जाफराबाद येथील संस्थान नवनाथ मंदिरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यंदा अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन संस्थानचे मठाधिपती भास्कर महाराज देशपांडे यांनी केले हाते. त्याचे तंतोतंत पालन केले गेले.