वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:40 AM2018-11-27T00:40:41+5:302018-11-27T00:41:08+5:30

भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील मेहगाव शिवारात एका २० वर्षीय अविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dead body of a 20-year-old woman was found | वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पारध/ धावडा : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील मेहगाव शिवारात एका २० वर्षीय अविवाहित तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पारध पोलीस ठाणे हद्दीतील धावडा ते मेहगाव रस्त्या दरम्यान एका नाल्याच्या काठावर सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास काही गुराखी गुरे चारण्यासाठी गेले असता, त्यांना एका तरुणीचा मृतदेह दिसला.त्यांनी ही माहीती तात्काळ पारध पोलीस ठाण्यात दिली. पारध ठाण्याचे सपोनि सुदाम भागवत यांनी भोकरदन चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील जायभाय यांना ही माहिती कळविल्या वरून जायभाय हे त्यांच्या पथकातील रामेश्वर शिनकर, गणेश पायघन,सागर देवकर, शेख असेफ, दुर्गेश राठोड, समाधान जगताप आणि पारध पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला.
सदर तरुणीच्या मृतदेहाजवळ आधार कार्ड आढळून आले. त्या वरून सदर तरुणीचे नाव छाया समाधान डुकरे असून तिचा पत्ता रा.जांब, ता.जि. बुलडाणा असल्याचे उघड झाले.
पंचनामा करून सदर तरुणीचा मृतदेह प्रा.आरोग्य केंद्र वालसावंगी येथे हलविण्यात आला असून रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती पारध पोलिसांनी दिली. सदरची माहीती मयत तरुणीच्या नातेवाईकांनाही देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
सदर तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसत असल्याने हा खूनच झालेला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उबाळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सपोनि सुदाम भागवत हे करीत आहेत. या युवतीच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: Dead body of a 20-year-old woman was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.