उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:28 AM2019-05-05T00:28:57+5:302019-05-05T00:29:07+5:30
अंबड तालुक्यातील गोंदी येथील व्यापारी राहुल महावीर काला (३६) यांचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी येथील व्यापारी राहुल महावीर काला (३६) यांचा शनिवारी दुपारी उष्माघातानेमृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
काला हे शनिवारीे सकाळी दुचाकीने जालना येथे गेले होते. भर उन्हातच ते बारा साडेबारा वाजेच्या सुमारस दुचाकीने शहागड मार्गे राक्षसभुवन येथे अमावस्या निमीत्त दर्शनासाठी गेले होते.येथून ते दुपारी १.३० सुमारास गोंदी येथे घरी परतले व उन्हातून आल्यामुळे त्यांनी पत्नीला पाणी मागितले व पाणी पिल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्या दरम्यान डॉक्टराना बोलावले असता डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.
उन्हाच्या तीव्रतेमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती डॉ. परीक्षित जहागीरदार यांनी दिली. राहुल काला यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, एक सहा वर्षाचा मुलगा, एक तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. राहुल काला हे कोणाच्याही मदतीला धावून जाणारा युवक म्हणून पंचक्रोशित ओळख होती. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.