जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:12 AM2019-06-17T00:12:14+5:302019-06-17T00:12:29+5:30
विहिरीचे खोदकाम सुरू असताना डोक्यात दगड पडल्याने एक मजूर गंभीर जखमी झाला होता. मागील पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना डोक्यात दगड पडल्याने एक मजूर गंभीर जखमी झाला होता. मागील पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आव्हाना येथील नाना सिताराम ठाले (वय-३५) हे सुरेश एकनाथ ठाले यांच्या विहिरीवर २ जून रोजी काम करत होते. खोदकाम सुरू असताना विहिरीच्या कडावरून एक दगड खाली कोसळून नाना ठाले यांच्या डोक्यावर पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नाना ठाले यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी झुंज देणा-या नाना ठाले यांचा रविवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दगड डोक्यात पडून गंभीर झालेले मजूर नाना ठाले यांचा ऐन वटपौर्णिमेदिनी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावातील महिलांनी वडाची पूजा करणेही टाळले.