११ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय ‘आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:38 AM2018-12-09T00:38:34+5:302018-12-09T00:38:53+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील ८ महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांनी दिली आहे.
अविष्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावे, यासाठी विद्यापीठातर्फे दरवर्षी कलाविष्काराचे आयोजन केले जाते. यंदा या अविष्कारासाठी ८ महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदिविला आहे. २०१६ पासून हा अविष्कार जिल्हा व विद्यापीठ अशा दोन स्तरावर घेतला जात आहे. जिल्हा स्तरावर जे प्रथम, द्वितीय व तृतीय येतील त्यांना विद्यापीठ स्तरीय अविष्कारासाठी पाठवले जातात.
विद्यापीठ स्तरावर ही स्पर्धा चार जिल्ह्यात होत असून, त्यातून विद्यापीठाचे ४८ विद्यार्थी राज्य स्तरावर पाठविले जातात. प्रत्येक गटातून राज्य स्तरावर पहिला व दुसरा येणाऱ्यांना राज्यपाल कार्यालयाची फेलोशीप दिली जात आहे. हे प्रदर्शन मंगळवारी १२ ते ४ या वेळेत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. तसेच यासाठी शहरातील २० शाळा व महाविद्यालयांना प्रदर्शनाला भेटीसाठी बोलविण्यात आले आहे. तसेच येथे येणाºया उद्योजकांकडून कार्यक्रमावर सजेशन घेतले जाणार आहे. यावेळी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, तुषार धोंडगे, मनोज मेहर, राजेश सरकटे आदिंची उपस्थिती होती.