दोन नगरसेवकांच्या निर्णयामुळे इच्छुकांमध्ये कही खूशी कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:44+5:302021-09-24T04:35:44+5:30

सध्याची स्थिती जालन्यात कायम : एक प्रभाग एक नगरसेवकावर अधिक भर लोकमत न्यूज नेटवर्क जालना : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ...

The decision of the two corporators has caused some happiness and some grief among the aspirants | दोन नगरसेवकांच्या निर्णयामुळे इच्छुकांमध्ये कही खूशी कही गम

दोन नगरसेवकांच्या निर्णयामुळे इच्छुकांमध्ये कही खूशी कही गम

googlenewsNext

सध्याची स्थिती जालन्यात कायम : एक प्रभाग एक नगरसेवकावर अधिक भर

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ज्या ज्यावेळी नगरपालिका, महापालिका निवडणुका घेतात. त्यावेळी प्रभाग रचनेवर बदल करण्यावरून खल सुरू होतो. याहीवेळी असेच झाले. आधी या सरकारने एक प्रभाग एक नगरसेवक असे धोरण राहील, याचे संकेत दिले होते. परंतु नंतर यात बदल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील पालिकांचा विचार करता अ वर्ग नगरपालिका म्हणून केवळ जालना नगर पालिका आहे. उर्वरित अंबड, भोकरदन आणि परतूर या ब वर्गामध्ये मोडतात. त्यामुळे येथेही प्रत्येक प्रभागातून दोन जणांना गेल्या निवडणुकीत संधी मिळाली होती. हाच निर्णय याहीवेळी कायम राहिला आहे. यामुळे याचे संमिश्र पद्धतीने स्वागत होत आहे.

मध्यंतरी २००१मध्ये आणि नंतर २०१६मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला होता. आता नगराध्यक्षांची निवड ही नगरसेवकांमधून होणार की, पुन्हा जनतेतून याबद्दल मात्र, स्पष्टता दिसत नसून, नगरसेवकांमधूनच ही निवड होईल, अशी अधिक शक्यता आहे.

पालिकेतील

सध्याची स्थिती

जालना पालिकेत सध्या ६३ नगरसेवक आहेत. याहीवेळी प्रभाग रचना असून, प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक राहणार आहेत. केवळ प्रभागातील आरक्षण आणि प्रभागांचा आकार कसा राहील, याबद्दल मात्र, अद्याप निश्चित ठरले नाही. त्यामुळे अनेकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

आता अशी असेल पालिकेतील स्थिती

जालना पालिकेतील प्रभागांच्या फेररचनेचा कार्यक्रम सध्या चारही नगर पालिकांमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांच्या मंजुरीसाठी तो पाठवावा लागतो. त्यामुळे ही मंजुरी आल्यावरच स्थिती स्पष्ट होईल.

एका मतदाराला दोघांना द्यावे लागणार मत

गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही एका मतदाराला दोन उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. हे दोन उमेदवार नेमके कोण असतील, हे उमेदवारी जाहीर होऊन अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक म्हणजे विकासाला खीळ असून, प्रभागातील कामेही आपणच केल्याचे यामुळे सांगावे लागणार आहे. - संध्या देठे

बहुसदस्यीय प्रभाग रचनेतून विकासाची स्पर्धा निर्माण होते. कामे कोणी केली, हे नागरिकांना चांगलेच माहीत असते. - अशोक पांगारकर

नगर पालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य सरकारने निर्णय घेताना बराच गोंधळ घातला. परंतु शेवटी मुंबई सोडून अन्यत्र एक प्रभाग दोन नगरसेवक या निर्णयावर ठाम राहिले. जालना शहरातही हाच नियम लागू राहणार आहे. त्यामुळे कुठलाच बदल झाला नसल्याने जैसे थे परिस्थिती राहणार आहे.

- राजेश राऊत, भाजप

राज्यातील आघाडी सरकारने प्रभाग रचनेमध्ये दोन उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून, यातून वार्डातील विकासकामे करताना दोन वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक असले तरी त्यांच्यात चुरस निर्माण होऊन प्रभाग विकास गतीने होऊ शकतो.

- नंदकुमार जांगडे, राकाँ.

राज्य सरकारने बऱ्याच विचारानंतर एक प्रभाग दोन नगरसेवक हा जुनाच निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जालन्यात गेल्या वेळेप्रमाणे स्थिती राहणार आहे. याचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला होईल, हे आताच सांगणे कठीण असले तरी नागरिक सजग असतात. त्यामुळे ते विकास करणाऱ्यांनाच प्राधान्य देतात.

- शेख महेमूद, काँग्रेस

सरकारने जो निर्णय घेतला आहे तो मान्यच करावा लागतो. दूरवरचा विचार करून सरकारने एक प्रभाग दोन नगरसेवक असा जुनाच निर्णय किमान नगर पालिकांसाठी कायम ठेवला आहे. यामुळे या निर्णयाचे स्वागत करूनच आपल्याला आतापासून नियोजन केल्यास त्याचा लाभ होऊ शकतो.

- विष्णू पाचफुले, शिवसेना

Web Title: The decision of the two corporators has caused some happiness and some grief among the aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.