गूळ बाजारावर दर कपातीची संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:56 IST2018-12-30T00:54:47+5:302018-12-30T00:56:55+5:30
शेतक-यांच्या गूळाला देखील भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

गूळ बाजारावर दर कपातीची संक्रांत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथील गूळ बाजारात लातूरसह अन्य जिल्ह्यातून गूळाची आवक बऱ्यापैकी असली तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० ते ४०० रूपयांनी दर कमी असल्याने शेतक-यांच्या गूळाला देखील भाव मिळत नसल्याने गूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जालना बाजारपेठेचे वैशिष्ट्य येथे विक्रीसाठी आणलेल्या गूळाला रोखीने पैसे दिले जातात.
जालना गूळ मार्केटमध्ये सध्या पाच ते सहा हजार गूळाच्या भेलीची आवक आहे. सरासरी दर हा २३०० ते ३ हजार रूपये प्रती क्ंिटल भाव मिळत आहे. हा बाजारात आलेल्या गूळाला गुजरात, औरंगाबाद, नाशिक भागात विक्रीसाठी जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या गावरान गूळला २१५० ते २४०० दर मिळत असून, युनिटच्या गूळाला २१६० ते २२०० रूपये दर मिळत आहे. रंगतदार गूळ २२०० ते २३०० दर मिळत आहेत. जालना लाल केसरी, गूळ पिवळा, गूळ केसरी, आदींचे दर हे २७०० रूपये दर मिळतात. सध्या गूळाची आवक ही घनसावंगी तालुक्यातील युनिटमधून येत असून, त्यात जोगलादेवी, खडका, भेंडाळा, तर परभणी जिल्ह्यातून पाथरी, मानवत तसेच औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, नवगण आदी ठिकाणांहून गूळाची आवक आणि उत्पादन होत असल्याचे सांगण्यात आले.
सण : संक्र ांतीच्या तोंडावर भाव पडलेलेच
संक्रांत आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तिळगुळाचे लाडू बनविण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुळाची मोठी गरज भासत असली तरी, यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत गुळाच्या दरात सरासरी २०० ते ३०० रूपयांनी घसरले आहे. आणखी दहा दिवसांनी गुळाच्या दरात अल्पशी वाढ अपेक्षित असल्याचे गूळ मार्केटचे सरचिटणीस गोविंद सराटे यांनी सांगितले.