केदारखेडा येथे तीव्र पाणी टंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:24 AM2019-02-04T00:24:04+5:302019-02-04T00:24:27+5:30
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे.
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे चार महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. टँकरचे प्रस्ताव प्रशासनाला पाठवूनही त्यावर अद्यापही निर्णय झाला नसल्याने ग्रामस्थांत संताप आहे. नदी उशाला अन... कोरड घशाला असा प्रकार झाला आहे.
परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिसरातील पुर्णा नदी ओसंडून वाहली नाही. नदी परिसरत असलेल्या शासकीय विहीरीरवुन गावाला पाणी पुरवठा होतो, मात्र हिवाळ्यातच विहिरीने तळ गाठला आहे. यामुळे गावातील नळाला चार महिन्यापासून पाणी आले नाही. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.यामुळे पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरुआहे. ग्रामपंचायत टँकरने पाणीपुरवठा करावा असा प्रस्ताव प्रशासना पाठविला आहे. मात्र त्याचा पाठपुरावा नसल्याने अद्यापही टँकरचा प्रस्तावाला मंजूरी मिळालेली नाही. तालुक्यातील महत्वाचे गाव म्हणून केदारखेड्याची ओळख आहे. असे असतांना गावात चार महिन्यापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याविना ग्रामस्थांचे हाल सुरु आहे. विशेष करुन महिलांना पाणी शेंदून आणण्याच वेळ आली आहे. ग्रा.प. प्रशासन टँकरचा प्रस्ताव पाठवून नामानिराळे झालेले आहे, गावाला चार महिण्यांपासून पाणी नसल्याचे त्यांना सोयर सुतक नाही, दिलेला प्रस्तावास मंजुरी का मिळाली नाही. यांची दखल ग्रा.प. कडून घेण्यात आलेली नाही. गुलदस्यात्यात आहे. केदारखेडा गाव तिन ठीकाणी विस्तारीत झालेले आहे. गावाची लोकसंख्या तीन हजारापेंक्षा जास्त आहे.गावाला पुर्णा नदी पात्रात असलेल्या विहिरीवरुन पाणी पुरवठा होतो. ग्रा.पं. दुर्लक्षामुळे विहिरीमध्ये मोठा गाळ साचला आहे. परिणामी विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे. आहे. विहिरीच्या कामाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. या गावाला बानेगाव मध्यम प्रकल्पातून कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची नितांत गरज आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याचे तीन महिने अजून जायचे आहे. या उन्हाळ्यात पाण्याविना हाल होण्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.